Author Topic: कोणीतरी आठवण काढत आहे---  (Read 3233 times)

Offline ankush.sonavane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
आतुरलेल्या डोळ्यांनी वाट पाहत आहे
पाणावलेल्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे
 कोणीतरी आठवण काढत आहे-------------

       वाऱ्यासंगे  बेचन होवून धावत आहे
      आठवणीच्या उन्हामध्ये होरपळून जात आहे
      कोणीतरी आठवण काढत आहे-----------

किनाऱ्यावरच्या वाळूत रुतून बसले आहे
आठवणीच्या लाटत अडकून गेले आहे
कोणीतरी आठवण काढत आहे-----------

      पावसाच्या थेंबागत जमिनीवर पडत आहे
      आठवणीचे पाणी बनुनी वाहत आहे
      कोणीतरी आठवण काढत आहे-------------

रात्र संपली तरी स्वप्न पाहत आहे
आठवणीच्या दुनियेत गुरफटून गेले आहे
कोणीतरी आठवण काढत आहे-------------   
                                        अंकुश सोनावणे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sindu.sonwane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 98
  • Gender: Female
Re: कोणीतरी आठवण काढत आहे---
« Reply #1 on: August 03, 2011, 02:43:48 PM »
आतुरलेल्या डोळ्यांनी वाट पाहत आहे
पाणावलेल्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे
 कोणीतरी आठवण काढत आहे-------------
      True Line, Khup Khup Chhan. Very Nice