कधी सांज ढळते ,कधी रात होते
दिव्याच्या प्रकाशी तशी बात येते ...
मनाच्या तळाशी , राहिले न काही
पाणी येता डोळा सारे, सारे सांगी जायी
आठवण तुझी येता , अनिवार्य मन होते ..
पाखरांची रांग , जाते रे निजेला
उन सावल्या ही येती येती रे उशाला
मनोमन हसून , सारे काही जागे होते ..
देह माझा खोटा , मन खोटे नाही
जुन्या ओळखिची नव नव लाई
मुक्यानेच प्रीत माझी तुला बोलाविते
ज्ञानदीप सागर ...