एक मित्र
एक मित्र अचानक माझ्या आयुष्यात आला
फोनवरुन मला ओळखलत का म्हणाला?
मी नाही म्हटल्यावर हसून त्याने फोन ठेवला
मन माझे विचार करू लागले
"कोण असेल हा?"
नंतर कळल मला फार लांबची
आणि अनोळखी ही व्यक्ती आहे
मी त्याला सॉरी म्हटले, कारण
मी त्याला भलतेच कोणीतरी समजून बसले
मी जे समजले होते, ती व्यक्ती त्याच्याच
शहारात वास्तव्याला होती, त्याच्याच कॉलेज ची होती,
त्यानी मला प्रश्न केला,
"तू जो कोणी मला समझली, खरच ती व्यक्ती कोण आहे तुझी?"
"मित्र की अजुन कोणी?"
मी म्हटले मित्र नाही पण
"मित्रा पेक्षाही जास्त " कारण
बोलली नाही मी कधी त्याच्याशी
डोळे मात्र सतत त्याच्याशी संवाद साधायचे,
ओठ मात्र गप्प असायचे, "
माझ्या या उत्तरावर तो हसलाच
"इतके प्रेम करतेस त्या व्यक्तीवर,
तर मग जाउन सांग त्याला"
नाही रे जमणार हे माझ्याशी
"समोर येताच तो शरीर माझ थरथरायला लागत,
मन माझ पाखरू बनून उडून जात."
"वेडी आहेस तू आज नाही
बोललिश तर कदाचित वेळ निघून जाईल म्हणाला."
काही दिवसानी माझ्याशी बोलण टाळल त्यानी
खूप फोर्स केला तेव्हा बोलला तो,
"दुखवायच नाही आहे तुला पण, आपली मैत्री आधुरी रहाणार,
नऊ महिन्यानंतर मी जग सोडून जाणार"
त्याच्या या उत्तरने मला धक्काच बसला,
काय झाल असेल त्याला, कळेन काही मला,
त्याचा माझा मात्र नेहेमी साठी संपर्क तुटला.
देवाजवळ केली मी प्राथना,
"सुखात ठेव तू माझ्या या मित्राला"
काही महिन्यनंतर पुन्हा त्याचा फोन आला
कसा आहेस तू म्हटल्यावर,
"पूर्णपणे बरा झालोय मी" म्हणाला
थोडीशी मी रागाहून म्हणाली "का रे संपर्क सोडला होतास,
का असा वागलास माझ्याशी?"
सॉरी आता परत तसा नाही वागणार म्हणाला.
मी पण भोळयापणाने त्याच्यावर विश्वाश ठेवला
आमची मैत्री पुन्हा जमली
"बोललीस नाही तू त्याच्याशी, आता कदाचित तो तुला
कधीच नाही स्वीकारणार"
दुखावली मनातून मी, का रे असा बोलतोस तू,
"कारण इतक्या वर्षात बोललिश नाही तू त्याच्याशी,
ते आता कस शक्य होणार
विसरून जा तू त्याला, कारण मिसळला
असेल तो तिकडच्या जगात"
नकळत चुक माझ्या हातून झाली
मित्र समजून मी त्याच्यावर रागावून गेली
पुन्हा त्याने माझ्याशी बोलन सोडल
मला पुन्हा तो दुखावून गेला
आणि जाता जाता इनडाइरेक्ट्ली पणे
मला चॅलेंज करून गेला
"तू आपल प्रेम कधीच व्यक्त नाही करू शकशिल
तुझ्या प्रिय व्यक्तिजवळ"
मलाही त्याचा फार राग आला
मी ही ते चॅलेंज स्वीकारल आणि
हिंमत करून बोलली मी माझ्या प्रिय व्यक्तीशी
"माझ प्रेम आहे तुझ्यावर"
सरते शेवटी हा मित्र जिंकला
त्याच्याशी बोलन्यासाठी मला हिंमत देऊन गेला
पण त्याने माझ प्रेम नकारल, हे सांगायच आहे या मित्राला
सांगायच त्याला शेवटी तू जे बोललस तेच खर ठारल
पण हे एकण्यासाठी हा मित्र कुठे आहे माझ्या आयुष्यात
आता मात्र मी एकटी आहे
आतून दु:खावलेली मनाने हळवी झालेली आहे,
पण तरीही आता मला मित्र नको आहे
कारण अचानक आलेला हा एक मित्र
आज अचानक माझ्या आयुष्यातून निघून
गेलेला आहे...................................
सिंदू.