सखी माझी बोले मंद मंद....मंद मंद.
लाविते जीव गोड छंद.
कुजबुजे कानी, गाते गोड गाणी,
करी जीव धुंद धुंद धुंद.
काल वाढली खेळली माहेरच्या अंगणात,
आज आली सासरी, जीव तिचा बंधनात,
मक्त डोईवरी पदर,वागण्यावरी नजर,
पायात पैंजण, हाती गोड कंगण,
लाजते बावरी, पदरा सावरी,
अण पसरे केसातल्या गजर्याचा गंध गंध.
सांज सकाळी सिंधूर भाळी,
घाबरा जीव तिचा लाज संभाळी.
अश्या ह्या नव्या नवरीचे,
दिस हे गोड कौतुकाचे,
त्यात शोधते हि भोळी,मलाच वेळो वेळी,
नव्या नात्यात शिरताना गुंफते रेशमाचे बंध बंध.
दिसभर हरवे गर्दीत,
राती सुखे निजते कुशीत,
स्पर्शाचे विरघळे अंतर,
फुटे मौनाचा बांध बांध ... बांध बांध.
माझ्या तळव्यावरी तिच्या हातांनी लिहिते,
काय काय स्वप्न आहे तिच्या मनी ते.
लिहून झाल्यावर ती सारी,
विचारे हलकेच ओठांनी करशील का रे पुरी,
बांधते विश्वास मनी, तिचाही आहे कुणी,
जो नेईल तिला नभापार,
देईल तिथला चंद्र चंद्र ........चंद्र चंद्र
....अमोल