का असा निघून गेलास?
का असा निघून गेलास
आयुष्यातून माझ्या
जीवनात माझ्या यायचे नव्हते
तर का वेडीआस लावून गेलास?
तूच मला प्रेम करायला शिकवलस
माझ्यातील नकारला प्रेमाने स्वीकारलस
वेड्या माझ्या मनाने तुला आपलस केल
माझ मन फक्ट तुझ झाल
तू दूर असूनही मनाच्या अगदी जवळ आलास
माझे डोळे फ्क्त तुलाच बघायचे
तुलाच शोधायचे
मनाचे सुंदर स्वप्न रंगवत होते
कि अचानक दु:खाचे डोंगर जवळ आले
मन रडूही शकले नाही इतकेस्थिर झाले
मला सोडून निघून गेलास
जीवनालाही परके केलास
शेवटचे दर्शनही दिले नाहीस
का असा निघून गेलास?
वेडी आस तुटून गेली
मन किती राडते कोणाला सांगू?
दु:खाचे सागरही कमी पडते
तुला शोधायला आता जगही कमी पडते
जीवनातील आनंद निघून गेला
तूच तर त्याला सोबत घेऊन गेलास
माझ्यातील होकाराही जानलस नाही
का असा निघून गेलास?
सिंदू.