प्रेमात पडुनी मी स्वप्नात वावरावे
उरी कवटाळूनी तुज नित्य गीत गावे
तुजसवे हिंडताना चांदणे खुलावे
तुझ्याच ओठांनी मी प्रेमगीत गावे
नेत्रास नेत्र भिडता तू लाजून चूर व्हावे
नकळत प्रिये मी तुज चुंबावे
लाडात तू येता तुज बाहूत घ्यावे
बाहू तुझे हे असे का थरथरावे?
नित्य तुझ्यासाठी मी हेच गीत गावे
माझ्या मनास मीच शांतावावे
भिरभिरणारे स्वप्न क्षनात दूर व्हावे
जागेपणी मी स्वतःस हिणवावे
माझ्या यातनांचे क्षीण गीत गावे
- मंगेश कोचरेकर