मन लागेना लागेना लागेना माझे,
का सारखे धावते तुझ्या मागे.
हि प्रीत अवखळ, जरी कि चंचळ,
तरीही निर्मळ भासे,
येई ना जवळ , वाढवी तळमळ,
आणि दुरुनीच हासे.
हे कोणत्या जन्मीचे जुळलेले धागे .
मन लागेना लागेना लागेना माझे.
होतात भास, कि हा प्रवास,
होतो तुझ्याच संगे,
क्षणी ना स्थिरते,असे हे फिरते,
तुझ्या रंगी रंगे.
तुझ्याविना जगताना जीवन वाटते ओझे.
मन लागेना लागेना लागेना माझे.
होई ना सहन, वाटते गहन,
तुझ्याविना जीवन,
माझे हे मीपण, तुलाच अर्पण,
केले कधीपासून.
हे इतके सोपे तरीही तुला कसे ना समझे.
मन लागेना लागेना लागेना माझे.
वाटे जरी तुला, मी हा असा खुळा,
परी प्रीत ना हि कच्ची,
करीन प्रेम अपार, जीवाच्या पार ,
शपथ हि पक्की.
तुझाच नुपूर कानात माझ्या सर्वकाळ वाजे.
मन लागेना लागेना लागेना माझे.
....अमोल