नाजुकश्या फुलांची का कळली किंमत कधी,
अव्यक्त भावनांनी नाकेलीहिम्मतकधी.
तू पाहिलास फक्त नेहमी वेडेपणाच माझा,
वेडेपणातले शहाणपण नसेलच कळले कधी.
तरी सुद्धा तुझ्यावरली प्रीत नव्हती संपत कधी.
तुला उगाच वाटायची गाठ भेट अपुली,
त्या भेटीतला अर्थ निरर्थक नव्हता कधी,
त्या क्षणांना मी न म्हटले नुसती सोबत कधी.
अबोल जरी ओठ तरी हृदयात आकांत होता,
डोळ्यातला भाव माझ्या दिसला का शांत कधी.
सावरण्यासाठीही न घेतलास हात हातात कधी.
तू थट्टाच केवळ केलीस माझ्या शुभेच्छांची,
इतकी नसेल केली तुझी काळजी कोणीच कधी,
उपेक्षा साहूनही ना तुझी सोडली साथ कधी.
तू सोडून जायचास एकटीलाच मला जेव्हा,
तक्रार ही जराशी मी ना केली कुठे कधी,
लटका रागही न तुला दाखवला डोळ्यात कधी.
तू माझ्यासमोर इतरांची करायचास सरबराई,
आणि त्यांदेखत करायचास थट्टा माझी कधी,
तरीही रुसू न दिले हासू ओठात मीही कधी.
पण निराश जेव्हा व्हायाचास नात्यांच्याबाजारी,
जखमा दाखवायला यायचास जवळ माझ्या कधी,
प्रीत नसता उरात का कोणी देते साथ दुख्खात कधी.
परत नवीन पंखांनी उडूनही जायचास,
आणि वळूनही माघारी बघायचास ना कधी,
झुरत राहिले एकटी पण घेतली ना हरकत कधी.
................अमोल