थेंब पानावरून केंव्हाच पाझरून गेला होता
वाहणारा अश्रू डोळ्यातच थांबला होता
मागे काहीच राहत नसते...................
भावनारुपी कोकिळा उडून गेल्या होत्या
केविलवाण्या पापण्या बंद झाल्या होत्या
मागे काहीच राहत नसते...................
सुकलेल्या फुलांतून सुगंध येत नव्हता
फिरफिरणारा वारा शांत झाला होता
मागे काहीच राहत नसते....................
बहररेला माळरान ओसाड झाला होता
सुगंधित फुलांनी देह सजवला होता
मागे काहीच राहत नसते....................
निघून जातात तरी आठवणी ठेवुनी जातात
थोड्या दिवसांनी त्याही डोळ्यात पाणी देवून जातात
मागे काहीच राहत नसते....................
अंकुश सोनावणे