Author Topic: सारे कळत नकळतच घडते  (Read 4310 times)

Offline kalpeshkolekar

  • Newbie
  • *
  • Posts: 7
सारे कळत नकळतच घडते
« on: August 25, 2011, 01:55:04 PM »
ढग दाटताच तुझ्या आठवणींचे,
मन आभाळा सारखं भरुन येतं ...

जसा पावसासाठी चातक पक्षी,
तसं मन तुझ्या भेटीसाठी आतुर होतं...

विरहाच्या उन्हात कोमेजलेलं मन,
तुझ्या सहवासातील वर्षावाच्या जाणीवेने फुलुन येतं...

मोर जसा पावसाच्या स्वागतासाठी पिसारा फुलवून नाचू लागतो
माझंही मन तुझ्या दर्शनाने असंच आनंदाने बहरतं ...

तुझ्या प्रितीच्या सरींमध्ये भिजून...
मन धरती प्रमाणे हिरवंगार होऊन जातं,

मात्र पावसानंतर जेव्हा तेच विरहाचं ऊन पसरतं...
वेडं मन पुन्हा एकदा तुझ्या भेटीची वाट पाहू लागतं

सारे कळत नकळतच घडते सारे कळत नकळतच घडते

Marathi Kavita : मराठी कविता

Offline mahesh4812

  • Jr. Member
  • **
  • Posts: 274
Re: सारे कळत नकळतच घडते
« Reply #1 on: August 26, 2011, 10:18:51 AM »
sare kalat nakalatach ghdate :-)

Offline sawant.sugandha@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 16
Re: सारे कळत नकळतच घडते
« Reply #2 on: September 07, 2011, 01:42:04 PM »