Author Topic: तुझ्या स्मरणांचे धुके  (Read 1890 times)

Offline gajanan mule

 • Newbie
 • *
 • Posts: 22
तुझ्या स्मरणांचे धुके
« on: August 31, 2011, 12:51:41 PM »
तुझ्या स्मरणांचे धुके
सतत वारा होऊन
सभोवताली सोबत करते

तुझीच मी , माझाच तू
म्हणत म्हणत
काही नवी काही जुनी
गोड गाणी गुणगुणते

कधी कधी
शब्दात माझ्या ताल शोधते
अन् कधी ...
मौनातले राग शोधते

फिरते...
भिरभिरते...
मुरते ... तसे ..
समोर येता ..
तूच कधी
...विरते ..!!

तुझ्या स्मरणांचे धुके  !!

गजानन मुळे   
mulegajanan57@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Saee

 • Jr. Member
 • **
 • Posts: 72
 • Gender: Female
 • Manakarnika
Re: तुझ्या स्मरणांचे धुके
« Reply #1 on: September 02, 2011, 02:32:09 PM »
khup chan :)

Offline gajanan mule

 • Newbie
 • *
 • Posts: 22
Re: तुझ्या स्मरणांचे धुके
« Reply #2 on: September 02, 2011, 11:21:04 PM »
धन्यवाद  :) :)