Author Topic: तो असा ........ तो तसा  (Read 1942 times)

Offline truptikadam

 • Newbie
 • *
 • Posts: 12
 • Gender: Female
तो असा ........ तो तसा
« on: September 03, 2011, 11:23:49 AM »
तो असा  ........ तो तसा
तो नक्की आहे तरी कसा ?
अल्लड, अवघड तरीही सर्वाना आवडेल असा.
तो आहे त्याच्यासारखाच !...... स्वछंदी
त्याच्या येण्याने सर्व जग बदलून जाते.
सारे काही सुगंधी, संगीतमय... हवे हवेसे वाटणारे.
तो फक्त बोलला तरी ग्रीष्मात पाउस पडेल.
तो एकदा हसला तर निमिषभर तोच दिसेल
त्याच्या प्रत्येक कृतीत प्रेम, मैत्री, माया
यांचा त्रिवेणी संगम........
त्याच्या त्या नजरेतील नजकातीला कसलीच तोड नाही...
मला आता त्याच्या शिवाय दुसरी कसलीच ओढ नाही.
त्याच्या निखळ मनात अडकून राहायला होतं.
त्याच्या निरागस हसण्यात हरवून जायला होतं
त्याच्या आवाजातील बंदिश जीव ओढून नेते ....
अलगद...... त्याच्याच जवळ ..
त्याचा तो गोड आवाज ... सतारीच्या सप्तसुरांचा
संगीतमय "निनाद" ........ तृप्त करतो मनाला ...
तो  नक्की कसा आहे.. त्याचे वर्णन करणे कठीण
समजण्यास तर त्याहूनही कठीण
पण तो असाच आहे...........
तो असा ... तो तसा... कसाही असला तरी..
फक्त फक्त माझाच आहे.


तृप्ती कदम
१०.०७.२०११
« Last Edit: September 03, 2011, 11:52:13 AM by talktoanil »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: TO ASA TO TASA
« Reply #1 on: September 03, 2011, 11:52:00 AM »
title marathi madhye post kara....applya kavita madhye te shabd ahet ..maag teech tile madhye copy paste kara....

I am editing the post now..pan pudhchya veli title suddha marathi madhye post kara...

 

Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
Re: तो असा ........ तो तसा
« Reply #2 on: September 04, 2011, 09:21:02 AM »
khup chan