होऊन बासरी मी करी तुझ्या असावे
ओठांवर फिरुनी मी ते प्रेम गीत गावे
एक एक सूर हळुवार तू सोडावे
लहरून खुशाल मी सप्तसूर गावे
धुंदुनी बेफान स्वर स्वरंशी जुळावे
तुझ्या बोटांवर मी ताल सारे अर्पावे
कधी रंगीत कधी कालिकेचे
कधी पाकळीचे कधी कोकिळेचे
नभांचे, जलाचे, कधी सागराचे
निर्झराच्या गीताने आसमंत जागवावे
मातीच्या गीताला कोवळे कोंब यावे
हिरव्या साजात धरतीने सजावे
काळ्या ढगात मायुरांचे पिसारे फुलावे
पर्जन्यात असे धुंद गीत जुळावे
कधी रांगडे स्वर निघावे पत्थरातून
धापावलेले श्वास उमटावे श्रमातून
कष्टकराच्या पडक्या झोपडीतून
जुळुनी गीत कष्टाचे ओघळावे
ओठांवर फिरुनी मी ते प्रेम गीत गावे
दत्ताराम कदम ...