शब्दामधले गीत बोलके हळूच कानी बोलावे
हृदयामधले भाव हे सख्या शब्दांनी कसे सांगावे
भाव तरळती नजरेवरती ते भाव तू जाणावे
मलाच कळेना शब्दा पुढचे ते तुला कसे सांगावे
थरथरना-या ओठांवरती भाव येती ताराळूनी
तुला सांगण्या आधीच सारे धैर्य माझे जाते गळुनी
या अतितेची गती निरंतर
नकोच वाटते इतके अंतर
एकरूप होऊन राहावे एका प्रवाहापरी
एकसंघ होऊन जावे एका किनार्-या वरी
स्वप्नील नयनांचे स्वप्नील सारे भाव
जडवून बसले मी तुझ्यावर जीवभाव
बांधून कल्पनेचे मनोरे मी मनात
राखून ठेवले शील गुप्त त्या धनाचे
होऊन तुझी मी तुझे तुलाच अर्पावे
हृदयामधले भाव हे सख्या शब्दांनी कसे सांगावे
दत्ताराम कदम ...