जीवनात अशी घडी
मी आज पाहिली,
ओंजळीतून पारिजात
मी त्यास वाहिली,
स्वप्नातील राजपुत्र
आला जीवनी,
जिवंत झाले स्वप्नातील,
विश्व मज मनी
क्षितिजाच्या निकट उभी
मी हाक मारते,
काव्यातील लपलेले
मी भाव छेडते,
जीवनाचा प्याला सुखाचा
भरून वाहतो,
पुनवेचा चंद्र जणू
मलाच पाहतो
चंद्र तार्यांच्या विश्वातून
मी हरविले,
पुसा सार्यांना, चंद्र तार्यांना,
कुणी मज पळविले,
नजर भिडता नजरेशी,
नयन हे झुकले,
सुगंध दरवळे चाहु देशेला,
जरी कुसुम हे सुकले
झुळूक वार्याची घेऊन आली
निरोप प्रीतीचा
तोच क्षण मी हे ठरविला
अपुल्या भेटीचा