Author Topic: तू  (Read 2435 times)

Offline Saee

  • Jr. Member
  • **
  • Posts: 72
  • Gender: Female
  • Manakarnika
तू
« on: September 05, 2011, 10:47:05 AM »
तू हवेतला गारवा

तू फुलातला मारवा

तू मधाळ गंधाच्या

गुलाबातील गोडवातू स्पर्श्तील पावित्र्य

तू नवख्यातील नाविन्य

तू नसताना अनुभवते मी,

तुझ्या असण्याचा आनंदतू शांतता नभातली

सळसळती वीज तू ढगातली

तू तान मधुर सुरातली

तू जिद्द माझ्या मनातलीतुझ्या असण्याचे अर्थ निराळे

तुझे नसणे जणू रिक्त रकाने

तुझ्या हसण्याची कैक कारणे

मज जगण्याचे तेच बहाणेमी वटवृक्ष पसरलेला,

तू वाटसरू त्या वाटेवरला

तव पाऊल उठण्या पूर्वी,

मी सावल्या अंथरलेल्या

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: तू
« Reply #1 on: September 05, 2011, 12:24:40 PM »
mast.....