चारच पाऊल चालुयात का,
तू आणि मी पुन्हा समांतर ?
उडूदेत का दोनच थेंब तुषार
पुन्हा तुझ्या नि माझ्या अंगभर
आठवूयात का पुन्हा तेच क्षण,
जे उडून गेले वार्या बरोबर
गुलाबी थंडी, हातात हात,
अन रंग निळा त्या मोरपिसावर
पाहूयात पुन्हा तेच स्वप्नं
दिसे जे पापणीच्या इशार्यावर
पुन्हा एकदा नवीन काव्य
लाजाळू च्या पाकळ्यांवर
चाल मोजुयात पुन्हा एकदा
इंद्रधनुष्या मधले रंग
उधळूयात का रे रंग प्रीतीचा
पुन्हा त्याच त्या सप्तरंगांवर
कर्तव्य धर्म तारण ठेऊन
चाल ना विसरू सारेच क्षणभर
चारच पाऊलं चालुयात का
तू अन मी पुन्हा समांतर ?