दुख माझे तुला हे कळू लागले
लोक माझ्या वारी मग जळू लागले
काय तूही दग्याला दिलासा दिला
पंख माझे अश्याने जळू लागले
आज रस्त्यात काटा मला बोलला
फुल त्याला म्हणे ते छळू लागले
मीच माझी समाधी इथे बांधली
हात भलती कडे का जुळू लागले
छान केलास तू वार त्याच्या उरी
पण तरी तो म्हणाला हळू लागले
चांदणे द्यायचे मी तुला बोललो
अन आकाशही मग ढळू लागले