तू येतेस अंधाराला उजेडाचा
रस्ता दाखवत
तेव्हा रात्र ऐन भारत आलेली असते
चांदणे अंधाराच्या पाउलखुनामागे धावत
असत.
मी रातकिड्यांची आवर्तने ऐकण्यात
मग्न झालेला असतो
तुझी चाहूल लागे पर्यंत.
मग तू बसतेस रडवेल्या चेहऱ्याने
चंद्राला अमावसेची भीती दाखवत मी मात्र
भिजल्या प्राजक्तागत स्तब्ध होतो
तुझ्या आसवांचा हिशोब ठेवत.
तू जातेस तेव्हा रात्रीचा भर
ओसरलेला असतो,
चांदणेही धावून थकले असते
हसऱ्या फुललेल्या चेहऱ्याने
तू निघून जातेस
मी मात्र रडवेल्या चेहऱ्याने बसला असतो
ओसरणार्या रात्रीला माझ्या
आसवांचा हिशोब मागत.