वाट पाहे साजना तुझी
उंबरठ्यावर उभी मी अशी,
सगळ्यांचे साजन परतले घरी,
तुजला का उशीर होई गडी,
शेजारणीची चूल पेटली,
स्वंयपाकाचा गंध दरवळा,
जीव माझा कासाविसला
उंबरठ्यावर उभी मी अशी,
अश्रुंच्या आड होई वाट पूसटशी,
मन माझे वैरी, वाईट चिंती
ढासळू पाहते विश्वाच्या भिंती
प्रशनांचे काहूर माजले मनी
लवकर सोडवं येऊनी घरी
उंबरठ्यावर उभी मी अशी,
वाट पाहे साजना तुझी.
-काव्यमन