अंतकरणावर भार ठेवूनी
अंतकरणावर भार ठेवूनी
आज मी तुला क्षमा करीत आहे
सुक्ष्म धागेच्या बंधनांच्या
जाळ्यातून तुला मुक्त करित आहे
बंधच आपले कमकुवत इतके
पाऊल तुझे पडले वाकडे
श्वास टाक तु पण मुक्ततेचा
काही न राहीले बाकी आता
मी पण जगत राहीन आजीवन
कारावास भोगीत असलेल्या
कैद्या सारखी संगे तुझ्या
- काव्यमन