अबोल आट्या
तुझ्या भालावरच्या
अबोल आट्या
काही तरी सांगत असतात,
तुझ्या मनात दडलेल्या
दुःखाच्या सुप्य कहान्या
ऐकवित असतात
मला माहीत आहे,
तुझे हसणं खोट असतं,
माझ्या संगे राहून
ते एकटं असतं
तुलाही कळतं
त्यात माझी चूक नाही
तरीही मन सलत असतं
मी काय करावे, ते तरी सांग
तु सुखी होशील कसे फेडू पांग.
- काव्यमन