मी अपराधी तुझा
मी अपराधी तुझा
लक्ष्मण रेषेत ठेून तुला
रामाच्या मर्यादा ओलांडलेला
मी अपराधी तुझा
अग्नीत ठेवून तुला
देह माझा जळालेला
मी अपराधी तुझा
पिंजऱ्यात ठ्वून तुला
आकाशात एकटाच रमणारा
मी अपराधी तुझा
वाटेत सोडून तुला
दूरवर निघून गेलेला
मी अपराधी तुझा
वरमाळा गळ्यात घालून तुझ्या
मीच फास आवळलेला
-काव्यमन