तुझी आठवण आली आणि
पावसाला सुरूवात झाली.........
ढगान्चा गडगडात विजेचा कडकडात
मनी होत होत्या आठवणी
अजूनच दाट.............
आठवणी आणि पाऊस दोन्ही
वाढतच -बरसतच गेल्या.........
प्रत्येक थेम्बाने तुझा
स्पर्श जाणवून दिला.............
वा-याच्या झुळूकी सोबत
मातीचा सुगंध जणू
तुझाच तो भासला.................
आठवणीचे आणि पाण्याचे
ओहोळ वाहतच राहिले........
सूर्य तरी कसा मागे राहिल
तोही तुझी आठवण घेवून आला
आणि मनाच्या आभाळात
इन्द्रधनुष्य देवून गेला...............
मनाची अवस्था झाली अशी
पाऊस पडल्यावर आपल्या
रस्त्याची होते जशी.............
पाऊस आता थाबला आहे
पण आठवणीना कुठे
बंधारा आहे..................................!!!!!!!
-------------रोहित_दादा