Author Topic: असंच राहू दे ना आपलं नातं  (Read 2974 times)

Offline manoj vaichale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 111
  • Gender: Male
असंच राहू दे ना आपलं नातं
« on: September 22, 2011, 04:12:52 PM »
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;

आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया!
...
द्यायचंच असेल तर देऊ ओठांवर हसू,
कधी उदास असू, तर खुदकन हसता येईल

हृदयामध्ये थोडी अशी जागा -
जीवनाच्या वाटेवर दमलो कधी, तुझ्या सोबतीने बसता येईल

पण ज्या छळतील आपल्याला
अशा आठवणींचा गाव नको देऊया,

असंच राहू दे ना आपलं नातं ,
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!

प्रेमात नेहमी दुःखच असते .
मग कश्याला त्या दुखाच्या वाट्याला जाउया

प्रेम आहे न दोघात हे
आपल्या नजरेला कळू दे ना

असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!  manoj

Marathi Kavita : मराठी कविता