Author Topic: दूर कुठे, तळया काठी एक प्रीत फुलतंय  (Read 1583 times)

Offline mrralekar

  • Newbie
  • *
  • Posts: 32
    दूर कुठे, तळया काठी एक प्रीत फुलतंय,
    त्याचीच कहाणी तुम्हाला इथे सांगतोय.

    तळया काठचे फुल,मस्त उमलं,
    आणी तळ्यात प्रतिबिंब बघून खुद कान हसलं.
    स्वतःला बघून, नकळतच स्वतःशीच रमलं,
    आणी स्वतः ला भेटण्यास, आणखीच खाली झुकलं.
    स्वतः ला भेटण्यास, ते झाडाशी ही झगडल,
    ते काय करताय, हे भान ही हरवून बसलं,
    आणी, ते कधीच स्वतःच्याच प्रेमात पडलं.

    मधेच एक फुलपाखरू कुठून तरी आलं,
    पण, ते ही त्याला दिसून सुद्धा नही दिसलं.
    फुलपाखरू मात्र तिथेच घुटमळल,
    आणी व्यर्थ प्रयत्न करू लागलं.
    पण, फुल होत प्रेमात पेटलं,
    ते बघून, खिन्न फुलपाखरू कोलमडलं
    आणी, तिथून निशब्दच निघून गेलं.

    धुंद वारा ही,  त्याला दोलावू लागलं,
    तरी ही ते, प्रतिबिंब एकटक बघतच राहिलं.
    अचानक एक पान कुठून तळ्यत पडलं,
    आणी त्याच, प्रतिबिंबच विस्कटून गेलं.
    वेड फुल खूप गहिवरल.
    तरी ही त्याचे जीव लावायचे नाही थांबलं.
    अशांत तळ्यात स्वतःला परत शोधू लागलं.

    बघता बघता, पाणी स्थिरावलं,
    आणी प्रतिबिंब पुन्हा  एकदा झळकू लागल.
    स्वतः ला पुन्हा बघून ते फुलून हसलं.
    आणी स्वतःशी  आणखीच गुतलं.
    स्वतःला भेटायला शेवटी ते एकटच थांबल.

    वेळ मात्र निसटत राहिली,
    फुलही सोबत चिमु लागलं.
    तरीही ओढ त्याला तळ्याचीच लागली.
    झाडणे त्यास खूप समजावलं.
    पण शेवटी त्याने ही फुलास त्यागलं.

    फुल आपले खूप सुखावले,
    झाडाचे दु:ख ही, क्षणात विसरले,
    आणी शेवटी स्वतः मधेच सामावले.
    ते बघून झाडं मात्र पाणावले,
    आणी फुलाच्या वेड्या प्रीतीवर हरले.
    बघता बघता फुल तळ्यात निघून गेलं.
    पण, त्याची  ती अखेर भेट दाखून सगळ्यांना थरारून गेलं

    नंतर मात्र त्याने ही स्वाश सोडला.
    पण प्रेमाचा एकच क्षण त्यानेच अनुभवला.

    तुमचा मित्र,
    मेहर राळेकर ..............