Author Topic: तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....  (Read 4092 times)

Offline Prasad Ghadigaonkar

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Male
तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....


भेटायच होत मला, म्हणून बघायची ओढ लागली,
पण उशीर झाला म्हणून ट्रेन पकडायची जास्त गरज भासली,

कशी जाउ शकते मला ती बघित्यला शिवाय,
तिला माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय,

खूप राग आला म्हणून नाही उचलला तिचा मी फोन,
पण मन सांगू लागल, "तुज्या शिवाय तिला या जगात आहे तरी कोण?"

पण तरीही ती कशी जाउ शकते मला भेटल्या शिवाय,
तिला माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय.....

                                         
                  प्रसाद घाडिगावकर