Author Topic: ताई  (Read 7970 times)

Offline sindu.sonwane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 97
  • Gender: Female
ताई
« on: September 29, 2011, 04:50:32 PM »
ताई

“ताई” शब्द येताच ओटी
स्मित हस्या सोबत अलगद डोळे पाणावतात कदाचित
बहीणच नात असतच इतक सुंदर
म्हणूनच हस्या सोबत अश्रुही  सोबतीला  येतात
              बालपण आठवताच खळखळून हसावस वाटते
             अलगद मायेच्या पदरात तुझ्यासोबत लपावस वाटते
आजचा दिवस आठवताच
 तुला भेटून घट्ट मिठी  मारावासी वाटते
अगदी तशीच जशी तू सासरी जाताना मारली होती
                 पुन्हा आधीचे दिवस तुझ्या सोबत जगावेसे वाटतात
                 पण ते दिवस जगताना
                 तुझ्यासोबत भांडावेसे नाही ग वाटत
माझ्यासाठी तर तू बहिणीपेक्षा मैत्रीणच जास्त होतीस
म्हणूनच की काय नकळतपणे तुझ्या मैत्रिणीचा
मला तिरस्कार वाटायचा
               बहीण म्हणजे काय असत हे नात मला
              आज कळत तुझ्या माझ्यातला दुरावा 
              या नात्याला महत्तव आणून देतो
              तुझा माझा आधीचा सहवास 
               खरच  पुन्हा नाही ग येणार
तुझ्या सोबत कॉलेजला जाताना कुणी तरी
विचारल “जुळ्या का ग तुम्ही ?”
या प्रश्नावर हसता हसताच तू
म्हणालीस “लहान बहीण ही माझी”
किती छान वाक्य होत हे
मोठी असल्याचा तुझा आधार
आणि सोबतीला बहीनीची माया
                समजून घेतलस मला पुरेपूर तू
                पण मीच कदाचित तुला समजण्यात कमी पडली
                माझ्या प्रत्येक दु:खात समरस होणारी “तू”
                        माझ्या प्रत्येक वेदनेवर हळूवार फूनकर घालणारी “तू”
       माझ्या प्रत्येक चुकाना सुधरावणारी “तू”
       आणि आज सर्वात जास्त तुझी गरज
                     असतानि माझ्यापाशी नाही आहेस ती फ्क्त “तू”
 थोरली बहीण म्हणजे काय असते ते आज सांगावस वाटते
“आईची हुबेहुब छबी आणि सोबतीला निस्वारत मैत्रीची जोड
तुमच्या प्रत्येक भावनाना समजून घेणारी
भांडता भांडता तिच्याशी अबोला धरताच
या अबोल्याला भनग करणारी”
                  आज हे सर्व लिहिताना
            मनातल्या भावनानाबरोबर
            अश्रुही सोबतीला आहेत
माझ्या इतक्या लांब असूनही
अलगद माझ्या हातात तुझा हात
गुंफल्याचा भास होतो आहे
            आज पुन्ह ते दिवस जगावेसे वाटतात
           “बालपणीच्या खोड्या , शाळेतला सहवास ,कॉलेजच्या गप्पा
           आणि मानोसक्ट पणे तुझ्या सोबतीने राडता राडता हसने
            आणि हसता हसता भांडणे”
तुझा सहवास माझ्यासाठी खूप अनमोल होता
आणि म्हणूनच त्या अनमोल क्षणाणा
     “आठवणिंच्या सागरात
      मनाच्या शिंपल्यात
      ह्रूदयाच्या कप्प्यात
      फ्क्त एकाच नावाने कोरून ठेवल “ताई”.

                                                    सिंदू

Marathi Kavita : मराठी कविता


Offline radheyjoshi

  • Newbie
  • *
  • Posts: 16
Re: ताई
« Reply #1 on: September 29, 2011, 05:44:56 PM »
taaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'(

Offline manoj vaichale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 111
  • Gender: Male
Re: ताई
« Reply #2 on: September 29, 2011, 07:49:42 PM »
    समजून घेतलस मला पुरेपूर तू
                पण मीच कदाचित तुला समजण्यात कमी पडली
                माझ्या प्रत्येक दु:खात समरस होणारी “तू”
                        माझ्या प्रत्येक वेदनेवर हळूवार फूनकर घालणारी “तू”
       माझ्या प्रत्येक चुकाना सुधरावणारी “तू”
       आणि आज सर्वात जास्त तुझी गरज
                     असतानि माझ्यापाशी नाही आहेस ती फ्क्त “तू”
 थोरली बहीण म्हणजे काय असते ते आज सांगावस वाटते
“आईची हुबेहुब छबी आणि सोबतीला निस्वारत मैत्रीची जोड
तुमच्या प्रत्येक भावनाना समजून घेणारी
भांडता भांडता तिच्याशी अबोला धरताच
या अबोल्याला भनग करणारी”

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):