My Heart
आजही रात्र
तुझीच आठवण घेऊन येते
तुझ्या आठवणीची ज्योत
या डोळ्यात लावून जाते
या जीवाला एकांत सोडून
ही रात्र निघून जाते
अन् पुन्हा तुला शोधत शोधत
ही ज्योतही विझून जाते
आजही रात्र
तुझेच स्वप्न घेऊन येते
तुझ्या स्वप्नची आग
या काळजात लावून
रात्रभर जळत राहते
या जीवाला झळ लावुन
ही रात्र निघून जाते
अन् पुन्हा तुला शोधत शोधत
ही आगही विझून जाते
तुझाच विनोद..................