चला प्रेमाच्या गोष्टी करूया
चला प्रेमाच्या गोष्टी करूया,
थंडीतल्या कोवळ्या ऊन्हाचा
स्पर्श अनुभवतो तसा
प्रेमाचे प्रथम बोल बोलताना
अंगावर शहारे येताना
चला प्रेमाच्या गोष्टी करूया,
त्या रात्रांची, फक्त तारे न्याहाळताना
हळू हळू त्यांना लुप्त होतांना
चला प्रेमाच्या गोष्टी करूया
त्या भेटीच्या वेळेच्या, वेळ पालटून गेलेल्या
त्या वाट पाहीलेल्या काळाच्या
चला प्रेमाच्या गोष्टी करूया
प्रेम जुनं झाल्याच्या
ती तर केव्हाच विसरली
संसारात इतकी गुरफटली
मी अजून तसाच ओला
प्रेम वर्षावातून बाहेर न आलेला
- काव्यमन