पाहिले तुज...
पाहिले तुज पहिल्यांदा
पहातच बसलो
नजर त्या चेहऱ्यावरून
हलवू न मी शकलो
पाहिले तुज हसताना
पहातच बसलो
न कळे हे मजलाही
का मी पण उगी हसलो
पाहिले तुज रागात
पहातच बसलो
रागातील ते तेज पाहुनी
फिदा त्यावरी झालो
पाहिले तुज अवतीभवती
पहातच बसलो
भेट कधी आपली घडेल का
प्रश्नी ह्या अडलो