कधी हात हातात
कधी हात पाठीवर
स्पर्शाने तुझ्या
अंग मोहरते माझे
कधी कानी कुजबुज
कधी स्वैर गप्पा
शब्दांनी तुझ्या
मन बहरते माझे
हलकेच हसून रोखून बघणे
कधी रुसून नजर फिरवणे
डोळ्यात तुझ्या
हृदय हरवते माझे
कालचे दुःख नाही
उद्याची चिंता नाही
तुझ्या सुगंधी सहवासाने
आयुष्य दरवळते माझे
सरल जयकर.