Author Topic: कुठे हरवलीयेस काय शोधतेयेस  (Read 2329 times)

Offline soumya

  • Newbie
  • *
  • Posts: 10
  • Gender: Male
कुठे  हरवलीयेस  काय  शोधतेयेस,
या  शून्यात  काय  बघतेयेस.
 
कुठे  गेली  तुझ्या  नजरेतली  चमक,
आणि  उत्साहाची लाली  गालावरून.
कशी  आली  काजळी  या  पाणीदार  पणतीत,
आणि  कसं  काय  गुलाबातलं  हसणं  गेलं  सरून.
 
बोटांच्या  कळ्या  एकमेकांत  गुंफून,
अनुवाठीचं  कमळ  का ठेवलेयेस  त्यावर.
त्या  केसांना का  बांधून  शिक्षा  केलीयेस,
पसरू  दे ना  त्यांना  तुझ्या  चेहऱ्यावर.
 
का  वाहतोय  हा  काळजातला   झरा,
अगदी  पापण्यांचा बंधारा  तोडून.
आणि  शब्द  का  पसार  झालेयेत,
डोळ्यातल्या  अव्यक्त भावनांना सोडून.
 
काळजातल्या  झऱ्याला  आवर  जरासं,
भावनेला   करून  टाक  शब्दांच्या  हवाली.
नजरेत चमक  येऊ  दे  ओठांनाही हसू दे,
आणि  त्या  गालांवरी येऊ  दे  लाली.

त्या  केसांची  शिक्षाही  माफ  कर,
त्यांनाही  मोकळा  श्वास  दे,
त्यांना  भरकटू  दे  वाऱ्यावर  एकवार,
तुही  मोकळेपणाचा  श्वास  घे.

सोडव  ती  बोटांची  गुंफण आणि,
ते  तळहाताचं  पान  ठेव  माझ्या  हातावर,
माझ्या  हवाले  कर  तुझे  दुख्ख,
आणि  तो  हात राहू दे  हातात  आयुष्यभर.

----------------------------------    सौम्य