मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस
मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस
आपल्या मैत्रीच्या नात्यात पहिल्यापासून परकेपणा होता
तो दूर करण्याचा माझा अट्टाहास नह्वे तर केविलवाणा प्रयत्न होता
तुला ओळखण्याच्या नादात मी स्वतालाच ओळखू लागलो
नि जे काही हरवलं होतं ते सारं शोधू लागलो
सापडल्या बऱ्याच गोष्टी, नह्वे नह्वे सारं काही मिळाला
पण डोळे उघडून पाहिलं, तेव्हा तू कुठे आहेस?
मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस
चुकलो असेन मी बऱ्याच वेळा जीवनात
नि तू कधीच तिथे नव्हतीस मला सावरण्यात
मग आता का तुझी इतकी नड जाणवते?
उत्तर माहित नाही पण प्रश्नाने वेड लागते
तुला विचारावा म्हटलं तर तू कुठे आहेस?
मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस
तुझी ती कातरवेळ जेव्हा माझा सुगावा घेईल
त्या दिवशी माझ्या जन्माचा सार्थक होईल
मी अजूनही स्वप्न पाहतो तुझ्या माझ्या मीलनाच
पण ते स्वप्न माझ्या एकटयाचच आहे, तू कुठे आहेस?
मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस
मी तुझा होऊ शकलो नाही तरी मी माझाच आता झालोय
देवाकडे फक्त तुझ्या सुखाचीच प्रार्थना करतोय
एकटा नाही मी सोबत तुझ्या आठवणी आहेत
पण वेडं मन सतत विचारेल तू कुठे आहेस?
मी कधीच नाही म्हटलं कि तू माझी आहेस
किरण गोकुळ कुंजीर