तुझी आठवण काढत वर्षातून एकदा पितो अन्
ओल्या गवताला उगीच आग लावण्याची चेष्टा करतो
सोडून देता येत नाही म्हणून प्राण जपून ठेवतो हृदयात
जमिनीवर पाडायचे नाही म्हणून अश्रू साठवून ठेवतो डोळ्यात
तुला पाहण्यासाठी तरसले डोळे अंगात उरला नाही त्राण
पुढच्या जन्मी तरी सावित्री मलाच म्हण सत्यवान
माझी कविता असते नेहमीच माझ्या मनाचं दर्पण
प्रेम दिवशी या आज करतो आपल्या असफल प्रेमाला अर्पण
किरण गोकुळ कुंजीर