बालिका दिन
आज एकदाची जन्मलीस तू, मुलगी म्हणून माझ्या पोटी
आत्ताच आळविले मी, अंगाईगीत तुझ्यासाठी
विसरलेच होते मी स्वतःला, माझ्यातल्या या मातृत्वाला
आणि माझ्यातच वाढणाऱ्या, एका जिवातील जीवाला
मी तुला संपवायचं ठरवलं, तेव्हा तू मला सावरलंस
अंकुर उपटू नये म्हणून, क्रूर हातांना आवरलंस
तुझ्या बोबड्या बोलांनी, मला वेळीच जागं केलं
भ्रूण हत्येच्या पापापासून, एका क्षणातच दूर नेलं
'सोनिया'ची 'प्रतिभा' लाभो, 'आशा' एकच जीवनी
'कल्पने'ची भरारी घे अन, बन तू 'तेजस्विनी'
--arun zinjurde