पाऊस पडून गेल्यावर वाहणारा थंड वारा,
जणूकाही देई मला तुझाच उबारा.
माझ्या केसांतून जाई थंडगार झुळूकशी,
जशी फिरावीत त्यात तुझी बोटं नाजुकशी.
ह्या वाऱ्याचा मारवा माझ्या कानांवर बसावा,
जसाकाही घ्यावा त्यांना तू हळुवार चावा.
वारा गालांवरी माझ्या येई इतका निकट,
जसे गोंजारती त्याला तुझे मऊशार हात.
माझ्या ओठांपाशी सुद्धा वाऱ्याची लगट,
जसे ओठांपाशी माझ्या तुझे कुजबुजती ओठ.
मी हात पसरुनी त्यात राही फक्त उभा,
वाटते कि मिठीत तुझ्या मी सामावलो सारा.
इवलेसे रोप जगे केवळ ह्याच भरवश्यावर,
वारा नाही तोडायचा त्याचे स्वप्नातले घर.
त्याची इवलीशी फांदी, इवला देठ, इवले पान,
वाऱ्याच्या स्पर्शाने वेडं हरवून बसे देहभान.
झाड विसरते मग त्याची वाढण्याची दिशा,
वाऱ्यासंगे जाई सकाळ, वाऱ्यासंगे निशा.
शिर शिर पानांची जाते शहारून,
हे असे होते सारे वारा गेल्यावर स्पर्शून.
आठवण त्या वाऱ्याची अशी काही येते,
त्या वाऱ्याशिवाय जगण्याला मिळेचना थारा.
----------------------------------------सौम्य