माझे दुख नाही कुणा कळले ....
जन्मताच मला सगळीकडे काटेच दिसले
जन्मापासून मला फक्त दुखच भेटले
माझे दुख नाही कुणा कळले ...............
झोपेतच मला कोणीतरी घेवून गेले
येताच जाग मला सगळी कडे पाणीच दिसले
माझे दुख नाही कुणा कळले ...............
माझ्या सुंदरतेचा सगळे वापर करत गेले
कोणी हातात घेतले तर कोणी पायात तुडवले
माझे दुख नाही कुणा कळले ...............
शोभेसाठी मला घरात ठेवले
काहींनी तर मला अंतयात्रेत उधळले
माझे दुख नाही कुणा कळले ...............
रडताना एक फुल पहिले दया आली म्हणून हातात घेतले
दुखी मनाने बोलू लागले मानवाने माझे जिवन संपवले
माझे दुख नाही कुणा कळले ...............
अंकुश सोनावणे