झोंबताच अंगाला गारवा आठवण तुझी येते
मिठ्ठीत घेण्यास हात पुढे करता समोर तू नसते.
आठवते का तुला पहिली आपली भेट
गुलाब्या थंडीत ओठाला भितालेले ओठ.
तू ही अबोल मी ही अबोल सगळच काही शांत शांत
वेडावलेल्या पाखरांना मिळालेला हा एकांत.
श्वसात श्वास गुरफटून गेला होता
कोकिळेचा मधुर सूर कानी ऐकू येत होता.
आज ही आठवतो तो दिवस झोंबताच अंगाला गारवा
क्षणातच उडून जातो मनातील परवा.
अंकुश सोनावणे