सुट्टीत गावाला गेलो होतो... लोडशेडींग च्या कृपेने दर संध्याकाळी लाईट नसायचा... अशाच एका संध्याकाळी रॉकेलचा दिवा घेऊन पुस्तक वाचत असताना काही पाखरं दिव्याभोवती गिरक्या घेऊ लागली.. इतक्यातच एका पाखराला (पतंगाला) चटका लागला... तो तडफडत खाली पडला अन...
प्रेमापाई उडी घेता
अंगाची लाही लाही
प्रेमवेड्या पतंगाला
कोण समजावणार बाई
जाऊ नको रूपावरी
होते सांगितले अनेकांनी
परंतु डोळे हे दिपलेले
कानांनीही त्यांचे ऐकले नाही
होता अतीरेक प्रेमाचा
उडी घेतली प्रेमापाई
बसला देहाला चटका
आता पंखही उरले नाहीत
सांगणारेही झाले मुके
त्यांनी घेतले सोंग बघ्यांचे
रोखल्या नजरा त्याच्यावरी
तिच्यावर एकाचीही नाही?
बघणार्यांसाठी झाला हा खेळ
पतंगाच्या जीवनातली शेवटची वेळ
पण जिच्यामुळे हे घडतं
तिला याचा दुख्खही नसावं
दोष नाही सर्व पतंगाचा
दिपालीत होत्या अनेक पणत्या
तिनेच घातली मोहिनी त्याला
साध्याभोळ्या त्याच्या मनाला
बघणारे बघतात
जाळणारे जळतात
जाळणारे मात्र
निर्दोष सुटतात
असा हा अंत...
एका प्रेमकहाणीचा
खरच प्रेम हे
असाच असतं का?
लोभस स्वप्ने दाखवून
क्षणात जाळून टाकणारं?
का असतं ते
जीवनात सर्वांच्या
अमृतरसाचा
गोडवा भरणारं
प्रेम कसाही असो
पण त्या पतंगच काय
जीवापाड प्रेम करूनही त्याला
ज्योती काय मिळत नाय
प्रेमातील या प्राणाहुतीचा
अंत का कधीच होणार नाही
प्रेमवेड्या पतंगाला या
ज्योती का कधीच मिळणार नाही......
मिथिल शिंदे........