तुझा एक सहवास हवा हवासा वाटतो
सत्यात नसला तरी स्वप्नात मिळावासा वाटतो.
वाटते का तुला कधी माझ्या स्वप्नात यावं
गुपचूप येवून मिठ्ठीत मला घ्यावं.
तुझ्या त्या मिठ्ठीने मला जाग येवून जाईल
बंद पापण्याची उघडझाप सुरु होईल.
हरवून जाईल मी स्वताला तुझ्या सुंदर डोळ्यात
गुरफटलो आसेल आपण एकमेकांच्या श्वसात.
सहवास हा तुझा एक वेगळाच भासेल
प्रत्येक वेळी मला हवाहवासा वाटेल.
अंकुश सोनावणे