राजकुमार निघाले भेटीला स्वप्नीचा राजाला काल स्वप्नी आला
नटुनी थटुनी जात होते त्याच्या स्वागताला
मी लगबग लगबग वाटेवरुनी जाता तो अचानक आला
त्यांनी हाय स्वीटी ह्यालो म्हणुनी हात पुढे केला
अन केला अचानक प्रीतीचा पहिला हल्ला र्यान घातकीहो माझा केला
त्या धक्यान मी कशी सावरू आता
त्या धक्यान मी कशी सावरू आता
म्हणे हाय डार्लिंग ओळख म
मी कृष्ण, रोमिओ,नळ ,वासवदत्त
सखे राधे, जूलियात, दमयंती तूच माझी लता
लोटले त्यास मी पाठी वळवूनी रागे भृकुटी
मी,नीच ,पाझी, हलकट त्यास कि हो म्हटले
परी चेहर्यावरती क्रोध न मुली उमटले
मिचकावले नेत्र हसुनी मिठीत घेतले
मी क्रोधे तळमळले होवून लवल झाले बेभान
त्यास बुकलले ,हाणले पुन्हा पुन्हा चपालेन
परी मुली न आचरट जराही हाताला मागे
म्हणे प्रिये विसरली कसे प्रीतीचे धागे
मी तुझ्या बरोबर आहे युगांनी युगे
परी सरली प्रीत तरी परतुनी जातो मागे
त्या शब्दे मज जग अचानक आली
मी माझाच गृही पलंगावरी निजलेली
तो सामोरी नाही कशी magu मी माफी
मज आठवला तो अवलिया तो योगी
मज दिले दर्शन परी हाय मी अभागी
तो शामाल नंदन आला होता मज भेटी
तो नाथ जगीचा होती मुरली त्या ओठी
तो माझा हरी अन युग युगाचा सांगाती
मंगेश कोचरेकर