Author Topic: नाते तुझे-माझे  (Read 5488 times)

Offline sonu0210

 • Newbie
 • *
 • Posts: 2
नाते तुझे-माझे
« on: November 09, 2011, 01:27:54 PM »

(टीप- या कवितेतून मी प्रेम आणि मैत्री या दोन टोकामधील नाते कसे असे असू शकते हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे ... )


स्वप्नी माझ्या येऊन तू
फक्त गप्पा मारत बसतेस
तर कधी मिठीत येऊन
अचानक निरोप घेऊन जातेस

गप्प राहा ग आता
किती बडबड करतेस ...
सुख - दु:ख वाटताना
माझ्यावर का तू रुसतेस?

दिसलो नाही एकदा जरी
अबोला माझ्याशी धरतेस
आयुष्याची गणितं मांडताना
मैत्री मात्र विसरतेस ...!!!

माझ्याविना तू , तुझ्याविना मी
कधी ना राहू शकलो
तरीही या गोंडस नात्याला
प्रेम नाही म्हणू शकलो !!

बोहल्यावर चढलीस तेव्हा मात्र
नयनी दोघांच्या अश्रू तरळले
भाव नजरेतील सावरताना
लोकांनीही पहिले ...

मैत्री कि प्रेम म्हणावे
कधीच नाही कोणा कळले
नाते तुझे-माझे ..
असे कसे हे जगावेगळे ... !!!!!

............ वैभव आलीम (२२-११-१०)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline raghav.shastri

 • Jr. Member
 • **
 • Posts: 62
 • Gender: Male
Re: नाते तुझे-माझे
« Reply #1 on: November 09, 2011, 04:08:09 PM »
chan.. sundar... thodi ajun fulvayla jagi hoti... tari pan Chan kavita aahe...

Offline sawsac

 • Newbie
 • *
 • Posts: 46
Re: नाते तुझे-माझे
« Reply #2 on: November 10, 2011, 12:54:17 PM »
मैत्री कि प्रेम म्हणावे
कधीच नाही कोणा कळले
नाते तुझे-माझे ..
असे कसे हे जगावेगळे ... !!!!!
nice faar changli lihali aahes

Offline sonu0210

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: नाते तुझे-माझे
« Reply #3 on: November 15, 2011, 02:41:58 PM »
धन्यवाद मित्रांनो .
तुमच्या अभिप्रयातूनच खूप काही शिकायला मिळते आणि सुधारणा करण्यास प्रेरणा मिळते ..

Offline Pravin5000

 • Jr. Member
 • **
 • Posts: 180
 • Gender: Male
Re: नाते तुझे-माझे
« Reply #4 on: November 17, 2011, 05:42:22 PM »
khup chan kavita lihili aahes...

Offline shindemithil

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Male
Re: नाते तुझे-माझे
« Reply #5 on: November 17, 2011, 09:33:28 PM »
mastach