बापू
बापू तुमच्या नावाचा तेव्हाही व्यापार होता
तुमचे नाणे चालविण्याचा त्यांना अधिकार होता
तुमच्या आग्रहासाठी सत्त्य तेव्हा झुकत होत
तुमच्या नावावरती सारच काही खपत होत
तुम्ही वस्त्र त्यागून बरेच मोठे झालात
आणि सारा हिंदुस्तान बांधला काँगेसच्या दारात
नेहरूंशी सलगी म्हणून पतेलाशी पटले नाही
सुभाष योग्य असूनही त्यांना उभे केले नाही
क्रांतीविरांची सुटका करू शकत होता तुम्ही
मौनता पळून न सुताण्याघी घेतली हमी
म्हणूनच बापू वाईट तुम्ही सौदाच केलात
अहंकार जपण्यासाठी नेहृना हात दिलात
आताही तेच सुरु जावू तेथे घर भरू
सोनियांची गाणी ,सत्तेसाठी मर्जी धरु
नेहरू गेले ,गेल्या इंदिरा तरी त्यांची तीच तर्हा
तिकिटासाठी सत्तेसाठी उभे सारे यांचा दारा
गांधी गेले ,गेली टोपी परी गेली न गांधीगिरी
नावाचा व्यापार चालला चोर म्हणती हरी-हरी
गांधी नामे धमाल केली रिचर्ड बोले जय गांधी
जन्मात बनते मनासारखे घाला फक्त तुम्ही खादी
मंगेश कोचरेकर