आठवत........... हे मला
आठवत........... हे मला
तु मला बागेत
भेटायला बोलवायची.
भेटण्याच्या ठिकाणी लवकर येऊन
तु माझी वाट बघायची,
मी आल्यावर सर्व जग विसरुन
बोलत बसायची,
तुझी बडबड एकूण
मी तुझ्यावर रागवायचो,
"अग बस किती बोलतेस"
रागाच्या भरात सांगायचो,
तु रागावलेला चेहरा घेऊन
माझ्यापासून थोडी दुर जायायची,
मात्र तो राग तातपुर्ता
तुझ्याकडे गोड बघुण हसल्यावर,
पुढच्याच क्षणी तु
माझ्या मिठीत असायची,
म्हणायची..........
तुझ्या मिठीतुन सुटावस
वाटत नाही,
तुझ्या विना जगावस
वाटत नाही,
आपल हे प्रकरण
तुझ्या घरच्यांना समजले होत,
तु मला भेटायचे नाही
असे घरच्यांनी सांगीतले होते,
पण.....
पण एक दिवस असा आला
तुझी एक मैत्रीन चिँठ्ठी घेऊन
माझ्या जवळ आली होती,
ति चिठ्ठी मला मिळेपर्यत
तु हे जग कायमचे सोडून
गेली होती,
मी हे जिवन एका ओझे
प्रमाणे वागत आहे,
फक्त तुला दिलेल्या वचनामुळेच
आज जगत आहे,
तुझी बडबड एकण्यासाठी
आजही त्याच बागेत जात असतो,
तु येशील या आशेने
त्याच बाकावर बसत असतो,
जाऊन त्या निर्जीव बाकाला
एकच प्रश्न विचारतो,
असा आमच्या प्रेमात
दुरावा आलाच का,
प्रेम तर दोघांनी केले
तर शिक्षा फक्त तीलाच का,
तुला दिलेले वचन लवकरच
मी तोडणार आहे,
मिही हे जग सोडून
तुझ्याजवळ येणार आहे.
- विरा