प्रेमाचा नात जोडशिल का?
स्वप्नातला राजा तू,
राणी मला करशील का?
सोन्याचा मुकुट समजून,
मानाने मला जपशिल का?
राग,क्रोध माझया मनीचा,
औषध समजून घेशिल का?
आपल्या स्पष्ट,नितळ,निस्वारथी नात्याला,
प्रेमाचा ओलावा देशील का?
प्रेमात माझया पडलस तू,
मनाला माझया पटवून देशील का?
प्रेमाचा अरता ठाऊक नाही मला,
प्रेमाची ओळख करून देशील का?
मैत्रीच्या नाट्याचा आधार घेऊन,
प्रेमाचा नात जोडशिल का?