Author Topic: स्वप्न  (Read 2614 times)

Offline maddyloveu

  • Newbie
  • *
  • Posts: 9
स्वप्न
« on: November 15, 2011, 11:14:34 AM »
स्वप्न,
स्वप्न असतात काहीतरी बनण्याची
काहीतरी घडवण्याची,
कोणी इतिहास घडवला, कोणी ग्रंथ,
आपण काय घडवल हे पाहण्यासाठी,

स्वप्न,
स्वप्न असतात प्रेमाची, विरहाची, त्यागाची,
प्रेमासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांची,
प्रेमात हरुनही धडपड त्यात जिंकण्याची,
दुनियेला नजर देऊन प्रेम मिळवायची,

स्वप्न,
स्वप्न असावीत जगण्यासाठी,
सुखी जीवन बघण्यासाठी,
पडण्यासाठी, रडण्यासाठी, पुन्हा उठण्यासाठी,
उठून सर्व खर करण्यासाठी,
स्वप्न असावीत जगण्यासाठी,
स्वप्न असावीत...............

                               ..........मिथुन पाटील.

Marathi Kavita : मराठी कविता