आई तुला पत्र...
वेड्या मनाशी संवाद साधला,
नकळत तुझा त्यात उल्लेख झाला...
मनाचा कोपरा रिकामी दिसला,
क्षणात तू नसल्याचा भास झाला...
वेड्या मनाला समजावू कसा?
तुलना तुझी कोणाशी करू कसा?
रोज देवाजवळ प्रार्थना करतो,
तुझया एका भेटीसाठी पाच रुपयाच्या नाराळाचे आश्वासन देतो...
तू सोडून गेलिस तेव्हा मी लहान होतो,
"आई" हाक देण्यासाठी शब्दांना देखील जाणत नव्हतो...
बाबांनी रेकट्ली माझया मनावर,
"आई" या शब्दाची रूपारेशा...
पण तुझी कमी आजही भासते,
ठेच लागल्यवर "आई" बोलताना...
बाबांनी तुझी कमी भासु दिली नाही,
त्यांच्या डोल्यातील अश्रूंची धार अजूनही ओसरली नाही...
माझी समजूत काढण्यासाठी बाबा खूप उदाहरणं देतात,
पण त्यांची समजूत काढताना पुरेसे शब्दच जवळ नसतात...
शाळेत"आई" विषयावर निबंध लिहिताना,
डोळे माझे क्षणभर पानवतात...
मित्रांच्या मैफीलीत उद्गार तुझा होतच,
शब्दा ओठीचे विरून जातात...
माझे हे दु:ख बाबा जवळ व्यक्त कसे करू?
बाबा च्या डोळ्याटले ते अश्रू कसे सावरू???
-BHAGYASHREE KULSANGE...