मंद मंद आनंद अनुभविला
भावनांच्या नाती जुळल्या
मी आज मंद मंद आनंद अनुभविला,
रक्तात चेतनांचे झरे,
ह्रद्य ही आज कंपीला,
ह्रद्याचा मंद मंद आवाज, मी ऐकीला,
भावनांची ऐसी ताकद,
पाषाण ही आज पाझरला
तुझ्या बोलातून आज, देव ही प्रकटला
मी आज मंद मंद आनंद अनुभविला
काव्यमन