अन कर, नाजूक प्रेम…..
अर्धगोलाकार तिच्या भुवया वरती,
ठेव तुझी करंगळी,
डोळे बंद करेल ती
अनुभव तो नाजूक स्पर्श
अन कर, नाजूक प्रेम…..
गुलाबी तिच्या गालावर
फिरावं तुझी उलटी अनामिका,
लाजेल ती,
मग हुलूच बोटांनी उचल तिची हनुवटी
अन कर, नाजूक प्रेम…..
सांग तिला, माझे प्रेम आहे तुझ्यावर,
हसेल ती, पण पुन्हा एकदा म्हण,
माझे प्रेम आहे तुझ्यावर,
जवळ येईल ती,
मिठीत घे तिला,
अन कर नाजूक प्रेम......
रसाळलेल्या तिच्या ओठांवर
ठेव तुझे ओठ अलगद,
गोंधडेल ती, सावर तिला,
घे मातीधुंद चुंबन,
अन कर बेभान नाजूक प्रेम....
......रवी वारके
lovey.warke@gmail.com